आरोग्य व शिक्षण
गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील औषध खरेदी घोटाळा
औषधी निर्माण अधिकारी महेश देशमुख निलंबित

गडचिरोली, प्रतिनिधी –
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे २०१९ पासून सुरू असलेल्या औषध खरेदीतील आर्थिक अनियमिततेप्रकरणी बहुचर्चित औषधी निर्माण अधिकारी महेश प्रभाकर देशमुख यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
आरोग्य सेवा नागपूरच्या उपसंचालकांनी दिनांक १६ जुलै रोजी निलंबनाचे आदेश काढले असून, याप्रकरणातील चौकशीसाठी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.



