महाराष्ट्र

पत्रकारांच्या हक्कांसाठी सरकारला अल्टिमेटम – संदीप काळे यांचा इशारा

पत्रकारिता विषय गांभीर्याने घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू – व्हॉईस ऑफ मीडिया

मुंबई, विशेष प्रतिनिधी :-

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ – ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे उत्साहात आणि भव्यतेने संपन्न झाले. राज्यभरातून तब्बल दोन हजारांहून अधिक पत्रकारांच्या उपस्थितीने दोन दिवसीय अधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पत्रकारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सुदृढ पत्रकारितेसाठी एकूण १५ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत इशारा दिला की, “राज्य सरकारने पत्रकारिता हा विषय गांभीर्याने घ्यावा, अन्यथा राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील.”

प्रमुख ठराव – पत्रकारांच्या सुरक्षेपासून कल्याणापर्यंत

१. पत्रकारांचे किमान वेतन शासनाने निश्चित करून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी.

२. पत्रकार सुरक्षा कायदा अधिक कडक करावा, तसेच जिल्हा–तालुका पातळीवर पत्रकार संरक्षण अधिकारी नियुक्त करावेत.

३. पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी १० लाख आरोग्य विमा व २५ लाख अपघात विमा अनिवार्य करावा.

४. पत्रकार निवृत्तीवेतन योजना तातडीने लागू करावी.

५. सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये २% राखीव कोटा पत्रकारांसाठी द्यावा.

६.  जिल्हा प्रेस-क्लबांचे आधुनिकीकरण, ‘मीडिया सपोर्ट सेल’ सुरू करणे, राज्यस्तरीय पत्रकार प्रशिक्षण अकादमी स्थापन करणे.

 ७. न्यूज-पोर्टल नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.

 ८. पत्रकारांवरील खोटे खटले मागे घेण्यासाठी विशेष समिती स्थापन करणे.

 ९. आपत्तीग्रस्त पत्रकारांसाठी विशेष मदत निधी.

 १०. महिला पत्रकारांसाठी सुरक्षित निवास, प्रवास भत्ता, मातृत्व रजा, क्रेच सुविधा आणि कडक लैंगिक छळ प्रतिबंध व्यवस्था.

११. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विशेष पत्रकार सन्मान योजना सुरू करणे.

१२. सरकारला लवकर निर्णयाचा इशारा

अधिवेशनात पारित १५ ठरावांची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला प्रत्यक्ष भेटून देण्यात येणार आहे. तसेच सर्व सामुदायिक स्तरांवर पालकमंत्र्यांनाही मागण्यांचे स्मरण करून देण्यात येईल.

सरकारने या ठरावांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, राज्यभरात मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के तसेच राज्य पदाधिकारी व कोर टीमने दिला.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker