आपला जिल्हा
गडचिरोलीचे पत्रकार व्यंकटेश दुडमवार यांना ‘व्हॉईस ऑफ मिडिया’तर्फे उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्काराने गौरव
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पंढरपूर येथे सत्कार

गडचिरोली, प्रतिनिधी :–
व्हॉईस ऑफ मिडिया गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांना संस्थेच्या उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ या जगातील क्रमांक एक पत्रकार संघटनेच्या राज्य शिखर अधिवेशनात हा मानाचा पुरस्कार प्रदान झाला. पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात १५ व १६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या शिखर अधिवेशनादरम्यान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दुडमवार यांचा गौरव करण्यात आला.
दुडमवार हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये कार्यरत असून गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांत संघटनेच्या शाखा उभ्या करत ३०० पेक्षा अधिक सदस्यसंख्या वाढविण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वात या अधिवेशनाला जिल्ह्यातील तब्बल ७५ पत्रकारांनी सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीतील पत्रकारांसाठी मोठी घोषणा केली. पुढील वर्षभरात गडचिरोली येथे पत्रकार भवन उभारण्यात येणार असून पत्रकारांच्या निवासाची समस्या दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुडमवार यांच्या सन्मानाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया इलेक्ट्रॉनिक विंगचे राज्य प्रवक्ता महेश तिवारी, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय तिपाले, मुकुंद जोशी, विदर्भ सरचिटणीस सुमित पाकलवार, जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी, जिल्हा सरचिटणीस विलास ढोरे, महिला विंगच्या जिल्हाध्यक्षा रोशनी बैस, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत उपाध्ये, तसेच चामोर्शी, अहेरी, भामरागड, आरमोरी, धानोरा, देसाईगंज, कुरखेडा व एटापल्ली तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी दुडमवार यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



