आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

लॉयड 2026 लॉन्च : महिला क्रिकेटची ऐतिहासिक एन्ट्री

२० संघ सहभागी होणार

गडचिरोली, प्रतिनिधी :-

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे आयोजित गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) च्या २०२६ टी–20 सीझनचे नियम, वेळापत्रक आणि स्वरूप आज अधिकृतपणे घोषित करण्यात आले. आगामी हंगामाची सुरुवात १६ जानेवारी २०२६ रोजी पात्रता फेऱ्यांनी होत असून, गडचिरोलीतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना अधिक स्पर्धात्मक व सुव्यवस्थित व्यासपीठ देण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला.

सर्व सामने जिल्हा प्रेक्षागृह मैदान, धानोरा रोड, गडचिरोली येथे खेळवले जाणार आहेत.

२०  संघांची दमदार स्पर्धा

यंदाच्या सीझनमध्ये १२ तालुका संघ आणि ८ विभागीय संघ अशा एकूण २0 संघांचा सहभाग असणार आहे.

महिला क्रिकेटचा ऐतिहासिक समावेश:-

पहिल्यांदाच GDPL मध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

४ महिला संघांमध्ये २ नॉकआऊट सामने व ग्रँड फायनल खेळवली जाणार आहे.

या पावलामुळे जिल्ह्यात महिलांच्या क्रिकेटला नवे व्यासपीठ मिळणार आहे.

विभागीय संघांमध्ये :-

लॉयड्स, कलेक्टर्स इलेव्हन, पोलीस, CRPF, जिल्हा परिषद, गोंडवाना विद्यापीठ, वन विभाग आणि मीडिया संघ — यांचा समावेश आहे.

सर्व सामने BCCI व IPL मानकांनुसार खेळवले जातील.

स्पर्धेची रचना:-

मागील सीझनच्या क्रमवारीनुसार ८ संघांना थेट प्रवेश

उर्वरित १२ संघांमध्ये सिंगल नॉकआउट

त्यातून ६ संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र

अतिरिक्त २ संघांची निवड लकी ड्रॉने

अशाप्रकारे १६ संघांची अंतिम यादी

४ गटांमध्ये विभागणी व नंतर प्लेऑफ सामने

संघ रचना :-

प्रत्येक संघात १६ खेळाडू + ४ अधिकृत सदस्य अनिवार्य. स्थानिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी संघांना VCA–नागपूर झोनचे २ बाहेरील खेळाडू घेण्याची परवानगी.

खेळाडू नोंदणी व आयडी प्रक्रिया १० डिसेंबर २०२५ अंतिम तारीख.

स्पर्धेचे नियम:-

प्रति सामना २० षटके, गोलंदाजाला कमाल ४ षटके

पहिली ६ षटके पॉवर प्ले

सामना बरोबरीत — सुपर ओव्हर

२० षटके पूर्ण करण्यासाठी ९० मिनिटांची मर्यादा

गुण पद्धती :-

विजय – २ गुण,बरोबरी/NR – १ गुण, पराभव – ० गुण

प्रामाणिकपणा, सुरक्षा आणि शिस्तीस प्राधान्य

स्पर्धेदरम्यान ड्रेस कोड, अनुशासन, वाहतूक, भोजन नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक असून उल्लंघनास दंडात्मक कारवाई केली जाईल.

न्याय्य खेळ सुनिश्चित करण्यासाठी न्यूट्रल अंपायर, मॅच रिफरी आणि टीम इंटेग्रिटी ऑफिसर्स नेमले जाणार आहेत.

प्रत्येक मैदानावर फर्स्ट-एड सुविधा उपलब्ध राहतील. खेळादरम्यान मैदानात मोबाईल फोन व कम्युनिकेशन डिव्हाइसेसवर बंदी असेल.

क्रिकेटला नवी दिशा

GDPL २०२६ मुळे गडचिरोलीतील क्रिकेट अधिक सुव्यवस्थित, शिस्तबद्ध आणि सर्वसमावेशक होणार असून, जिल्ह्याच्या तरुण खेळाडूंना उच्च दर्जाची स्पर्धा, वाढीव संधी आणि उत्तम सुविधा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker