गडचिरोली, प्रतिनिधी :-
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, अर्धवेळ स्त्री परिचर आणि आशा वर्कर महिलांना अद्यापही कोरोना भत्ता न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रलंबित मागणीसाठी सिटू संघटनेच्या वतीने येत्या १३ एप्रिल रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर भव्य आंदोलन पुकारण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या काळात राज्यभर संकटाचे वातावरण असताना या महिलांनी अत्यल्प मानधनावरही मोठी जबाबदारी पार पाडली. शासनाने त्यांना प्रति महिना १००० रुपये प्रमाणे कोरोना भत्ता देण्याचा आदेश काढला होता. मात्र, हा भत्ता केवळ मोजक्या महिलांनाच मिळाला असून, जिल्ह्यातील बहुसंख्य महिला अद्यापही या लाभापासून वंचित आहेत.
पाच वर्षे उलटूनही न्याय न मिळाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी असून, या पार्श्वभूमीवर सुमारे २ हजार महिलांच्या सहभागाने हे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनात सिटूचे नेते कॉ. रमेशचंद्र दहिवडे, माकपाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. अरुण लाटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य कॉ. अमोल मारकवार, कॉ. अरुण भेलके यांच्यासह जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस व अर्धवेळ स्त्री परिचर महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button