गडचिरोली, प्रतिनिधी :-
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या ऐतिहासिक नारीशक्ती वंदन विधेयकाला समर्थन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज दिवार साक्षरी मोहिमेचे आयोजन मा.आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये करण्यात आले होते.
सनातन संस्थेच्या संचालिका सौ.लताताई समर्थ यांच्या स्वाक्षरीने “दिवार स्वाक्षरी” मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दिवार स्वाक्षरी मोहिमेला मा.आमदार श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा.आमदार श्री.परिणयजी फुके, माजी खासदार श्री. अशोकजी नेते,आमदार डॉ.मिलिंदजी नरोटे, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ,श्री. देवरावजी होळी, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे,माजी आमदार श्री.कृष्णाजी गजबे, ज्येष्ठ नेते श्री. बाबुराव कोहळे,श्री. इंजि. प्रमोदजी पिपरे संचालक महाराष्ट्र सहकारी संघ मर्या. पुणे, महामंत्री श्री. प्रकाशजी गेडाम महामंत्री, श्री. सदानंदजी कुथे, श्री. गोविंदजी सारडा महामंत्री मा. सौ.योगिताताई पिपरे,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष (माजी नगराध्यक्ष) तथा नगरसेविका गडचिरोली, सौ.सपनाताई मुनगंटीवार, ,सौ. रेखाताई डोळस, सौ.प्रणोतीताई निंबोळकर नगराध्यक्ष नप गडचिरोली, श्री .अनिलजि कुणघाडकर शहराध्यक्ष,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर,सौ. योगिताताई भांडेकर माजी अध्यक्ष जीप गड, सौ.सीमाताई कन्नमवार महिला आघाडी गड.शहर अध्यक्ष,सौ.वर्षाताई शेडमाके जिल्हा सचिव,प्रतिभाताई चौधरी, डॉक्टर भारत खटी हर्षल गेडाम सभापती नप गडचिरोली, देवाजी लाटकर, प्रा. अरुण उराडे,शेखर आखाडे,सौ.अलकाताई पोहनकर माजी नगरसेविका,अर्चनाताई निंबोळ नगरसेविका, सौ. शिल्पाताई हेमके नगरसेविका,सौ.गुड्डी ताई मारबते नगरसेविका,सौ.साक्षीताई बोलूवार नगरसेविका,कविताताई उरकुडे माजी शहर अध्यक्ष ध्रुपताताइ खेडेकर तसेच भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वाक्षरी करून या मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच ९६६७१७३३३३ या नंबरवरती मिस कॉल करण्यात आले.
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना राजकारणात समान संधी मिळावी या उद्देशाने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. स्वाक्षरी मोहिमेद्वारे या विधेयकाला समर्थन देण्यात येत असून महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी हे विधेयक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी महिलांनी या विधेयकाचे स्वागत करत महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे नमूद केले.
“दिवार स्वाक्षरी” मोहीम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. योगिताताई पिपरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी तसेच महिला आघाडी पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button