निवडणूक

देसाईगंज नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारांचे नामांकन दाखल

देसाईगंज, प्रतिनिधी :-

देसाईगंज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी आजपर्यंत एकूण नऊ उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून, यामुळे स्थानिक राजकारणाला वेग आला आहे. विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने या पदासाठी चुरस वाढली आहे.

नामांकन दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे :

१. गुरू मिलिंद बोरकर – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
२. केशव बापूराव आत्राम – शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

३. सुरेखा पूनम आत्राम – भारतीय जनता पक्ष
४. रेखाबाई रामदास विखार – अपक्ष
५. नलिनी कविता ओझा – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६.  विनोद अर्पण विश्राम – भारतीय जनता पक्ष
७.  विनोद अर्पण विश्राम – अपक्ष (दोन वेगवेगळ्या सामाजिक प्रभागांमधून)
८. सुनीता सखा मुळारीवार – भारतीय जनता पक्ष
९. वंदना भारतु बोरकर – अपक्ष

सर्व उमेदवारांचे नामांकनपत्र आज निवडणूक विभागामार्फत स्वीकारण्यात आले. छाननी प्रक्रिया, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि अधिकृत यादी निवडणूक निर्णय अधिकारी आगामी नियमानुसार प्रसारित करणार आहेत.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker