ताज्या घडामोडी
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालय बुधवार पर्यंत बंद
गडचिरोली,प्रतिनिधी :-
नुकतेच प्रादेशिक हवामान विभाग यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी आजपासून 2 दिवस ऑरेंज अलर्ट घोषित करीत असल्याचे सुधारित फोरकास्ट या कार्यालयास पाठविले असल्याने सर्व शाळा व महाविद्यालय २० जुलै २०२२ पर्यंत बंद राहतील असे सुधारित आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्था प्राधिकरण ,गडचिरोली यांनी काढले आहे .
संपूर्ण जिल्ह्यातील सर्व शाळा/विद्यालय/महाविद्यालय हे दिनांक -२० जुलै २०२२ बुधवार पर्यंत बंद ठेवण्याबाबत सदर आदेश, सुधारित करण्यात येऊन पुन्हा काढण्यात आले आहे, याची कृपया नोंद घ्यावी.असे जिल्हा प्रशासनाने काढले आहे.
सिरोंचा तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय २३ जुलै २०२२ पर्यंत बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्था प्राधिकरण ,गडचिरोली यांनी आज काढले आहे. या आदेशामुळे मागील ११ जुलै २०२२ ते २३ जुलै २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांना १५ दिवसाची सुट्टी मिळाली आहे.
जिल्ह्यात सद्या पूरसदृश स्थिती असल्याने आदेश काढण्यात आला आहे.
पुढील आदेश पहा :-




