आपला जिल्हाताज्या घडामोडी

कुंभी मोकासा येथील आपत्कालीन रुग्णाला बोटीने बाहेर काढून दवाखान्यात केले भरती

शिवणी नाल्यावरून पाणी वाहत असल्याने रस्ता होता बंद

गडचिरोली,प्रतिनिधी :-

कुंभी मोकासा तालुका गडचिरोली येथील आनंदराव मेश्राम या डायलोसिसच्या रुग्णाला तातडीने दवाखान्यात भरती करण्याची गरज भासली. तहसीलदार गडचिरोली महेंद्र गणवीर यांनी आरोग्य विभागाला संपर्क केल्यानंतर आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधला व सदर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी बचाव पथक पाठवण्याचा निर्णय घेतला.

गडचिरोलीच्या चामोर्शी मार्गावर शिवणी ते चामोर्शी मार्ग बंद असल्याने व गुरुवाळा मार्गही नाल्यावरून पाणी वाहत असल्याने बंद होता. कुंभी मोकासा येथून सदर रुग्णाला शिवणी नाल्याच्या तिथून बोटीने बचाव करून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्याचे नियोजन करण्यात आले.

पोलीस विभागाच्या MTS च्या बचाव पथकाने तातडीने बोट आणि आवश्यक मनुष्यबळ त्या ठिकाणी पाठवून रुग्णाला सुखरूप बोटीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून यशस्वी मोहीम राबविली. 

यावेळी शिवणी नाल्याच्या येथे सदर मोहिमेदरम्यान गडचिरोली पोस्टेचे पोलीस निरीक्षक कतलाम, जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे, तालुका आरोग्य अधिकारी सुनील मडावी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker