राजकीय

प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जास्त अंत बघू नये -जी के बारसिंगे

गडचिरोली,प्रतिनिधी :- 

   प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा अंत बघू नये व तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा वंचितच्या स्टाईलने संपूर्ण जिल्हाभर उग्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिले आहे

 

           गडचिरोली शहरातील बेघर व अतिक्रमण धारकांना घराच्या जागेचे पट्टे मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तहसिल  कार्यालयासमोर 25 जुलै पासून आमरण उपोषण सुरू असून तिन दिवसाचा कालावधी उलटला तरी प्रशासनातील कोणत्याही अधिका-यांनी अजून पर्यंत आमरण उपोषण कर्त्यांची भेट घेतलेली नाही, उपोषणाला वयोवृद्ध महिला सहीत शेकडो कारयकर्ते बसलेले असतांना सुद्धा वैद्ययकिय अधिका-यांनी भेट घेऊन साधी आरोग्याची तपासणी सुद्धा  केली नाही, उपोषण कर्त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामूळे प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा अंत बघू नये व तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा वंचितच्या स्टाईलने संपूर्ण जिल्हाभर उग्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिले आहे

       पुढे प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमरण उपोषणाला बसलेल्यांची आरोग्य तपासणी करणे वेळोवेळी करणे गरजेचे असतांना सुद्धा प्रशासन जाणूनबूजून दुर्लक्ष करत आहे व रास्त असलेल्या मागण्या मान्य करण्यास दिरंगाई करत आहे त्यामूळे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये व जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे त्यामूळे असंतोषाचा उद्रेक होण्याची वेळ आली तर ह्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे, त्यामूळे प्रशासनाने जास्तचा अंत बघू नये व तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्या असेही पत्रकात म्हटले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.