आपला जिल्हा
गडचिरोलीत पत्रकारांचा मूक मोर्चा

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली -छत्तीसगड येथील पत्रकार मुकेश चंद्रकांत यांची निर्घुण हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येचा निषेधार्थ उर्वरीत मारेकऱ्यांना पोलीसांनी पकडून कठोर शिक्षा घ्यावी या मागणीसाठी गडचिरोली येथे पत्रकारांचा मुक मोर्चा गुरुवार दि. ०९ जानेवारी २०२५ ला दुपारी १२ वाजता मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या नियोजित मोर्च्यात सर्व दैनिकांचे जिल्हा प्रतिनिधी , तालुका प्रतिनिधी , ग्रामीण प्रतिनिधी , साप्ताहिक विंग व लोकल दैनिकाचे जिल्हयातील संपादक ,पोर्ट , युटयुब प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींनी मोर्च्यात सहभागी होवून एकतेचे दर्शन घडवावे हि विनंती .
मोर्चा इंदिरा गांधी चौकातून जिल्हा कचेरीवर नेऊन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल तरी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे गुरुवार दि ०९ जानेवारीला दुपारी १२ वाजतापर्यंत एकत्रित जमावे व मुक मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



