आरोग्य व शिक्षण

गडचिरोलीत नशाबंदी मंडळातर्फे व्यसनविरोधी जनजागृती अभियान संपन्न

गडचिरोली,प्रतिनिधी :-

 महाराष्ट्र नशाबंदी मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने आणि  जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सहकार्याने शहरातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर कार्यशाळा घेण्यात आल्यात. तंबाखूजन्य पदार्थामुळे होणारे आरोग्यावर दुष्परिणाम या महत्त्वपूर्ण विषयांवर  कार्यशाळा महिला महाविद्यालयात घेण्यात आली.

या कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस सहनिरीक्षक पूनम गोरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ.  राजेंद्र दुपारे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. सविता साधमवार,  सामान्य रुग्णालयाचे मीना दिवटे, साखराच्या उपसरपंच सौ. अर्चना चुधरी प्रामुख्याने उपस्थित होत्या. याप्रसंगी महाविद्यालयातील मुलींना आरोग्य संबंधित तसेच तंबाखूजन्य पदार्थाचा  शरीरावर होणारा परिणाम यासंदर्भात माहिती देण्यात आली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नशाबंदी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष उदय धकाते आणि संघटक संदीप कटकुरवार यांनी केले होते.

स्वामी विवेकानंद सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये युवकांसाठी व्यसन विरोधी कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता अतकमवार होत्या  तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर  यांनी आपले विचार मांडले. प्रस्तावना जिल्हा संघटक संदीप कटकुरवार यांनी केले.  फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे  युवकांसाठी व्यसनविरोधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के . खंगार होते .प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,  सामान्य रुग्णालयाचे डॉ. खोरगडे, कवी चेतन ठाकरे, संदीप कटकुरवार, प्रा. विनोद कुकडे, प्रा. यादव गहाणे, प्रा. प्रज्ञा वनमाळी, प्रा. कविता उईके, रासेयो विभागाचे प्रा. दीपक तायडे, प्रा. हितेश चरडे यांची  उपस्थिती होती . विषयानुसार सर्व मार्गदर्शकांनी आपले समयोचित विचार व्यक्त केले. तसेच व्यसनविरोधी पोस्टर प्रदर्शन महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात आले होते.

याप्रसंगी प्रदर्शनी चे अवलोकन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.  सूत्रसंचालन प्रवीण टेकाम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राजक्ता सिडाम यांनी केले. सप्ताहाचा समारोप  नगरपरिषदेच्या नेहरू शाळेत च्या प्रांगणात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे होते. याप्रसंगी कीर्तनकार दिलीप मेश्राम, केशवराव दशमुखे गुरुजी, पंडित पुडके यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मंडळातर्फे आयोजित या सप्ताहात विविध महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शनी, व्यसनमुक्ती विषयावरील साहित्याचे वितरण, मार्गदर्शन, युवकांशी संवाद साधण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नशाबंदी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष उदय धकाते आणि संघटक संदीप कटकुरवार यांनी केले होते.

 

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.