आरोग्य व शिक्षण

वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया याच सत्रापासून सुरू करा.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे आमदार डॉ. होळी यांची मागणी 

मुंबई, प्रतिनिधी :-

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली चे भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांनी ना. हसन मुश्रीफ यांच्या कडे मुंबई येथे मंत्रालयात भेट देऊन केली.

आपण अथक प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्याला शासकीय महाविद्यालय मिळवून दिले असून याच सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी सतत प्रयत्न करीत आहे.परंतु काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अजूनही प्रवेश प्रक्रिया संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे या संदर्भातील असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली.

याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मंत्री महोदयांनी याच सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत व त्यातील असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत संबंधितांना निर्देशित केले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.