गडचिरोली,प्रतिनिधी :-
शहरातील मध्यभागात असलेल्या सर्व्हे नं.२१ येथील वनजमिनीवर काही भूमाफियांकडून ले-आऊट पाडून परस्पर विक्री करीत असल्याचे बाब उघडकीस आली असून याबाबत आमच्या प्रतिनिधीने वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतले असता याबाबत त्यांनी सांगितले कि वनजमिनीवर कोणीही अशाप्रकारचे कृत्य करीत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.
येत्या आठ दिवसांत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांना देणार आहोत. यात वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करणार असल्याचे यावेळी सांगितले.