राजकीय

अजितदादा पवार यांचा भाजपाच्या वतीने जाहीर निषेध

गडचिरोली,प्रतिनिधी :-

      महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते  अजित दादा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य केले. अजित दादा पवार यांनी आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा आणि हुतात्म्यांचा अपमान केलेला आहे त्यांच्या या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज दि. 2 जानेवारी रोजी इंदिरा गांधी चौकात जाहीर निषेध करण्यात आला तसेच त्यांच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली व नारे देऊन त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

        भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी  निषेध आंदोलनात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर, माजी नगराध्यक्ष तथा भाजप महिला आघाडी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा संयोजिका योगिता पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, माजी जिल्हा परिषद सभापती रंजीता कोडाप, भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर शहर महामंत्री केशव निंबोड, शहर महामंत्री  विनोद देवोजवार, महिला आघाडीच्या गडचिरोली तालुकाध्यक्ष अर्चना बोरकुटे महिला आघाडीचे शहराध्यक्ष कविता उरकुडे, ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चना  निंबोड, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, दलित आघाडी चे शहर अध्यक्ष प्रा अरुण उराडे,युवा मोर्चाचे शहर महामंत्री हर्षल गेडाम, मंगेश रणदिवे, निखिल चरडे, राजू शेरकी , आशिष कोडाप , बबन सूर्यवंशी, दीपक सातपुते श्यामजी वाढई, जनार्धन भांडेकर, रश्मी बाणमारे कोमल बारसागडे, पुष्पा करकाडे, पुनम हेमके, ज्योती बागडे, वछलाबाई मुनघाटे तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.