महाराष्ट्र

पत्रकार निलेश सातपुते यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पुरस्कार जाहीर

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

लोकवृत्त न्यूज पोर्टल चे संपादक तथा राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश सातपुते यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन चंद्रपूर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात ५ मार्च २०२३ रोजी करण्यात आले आहे.

निलेश सातपुते हे गत २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते  राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी असून लोकवृत्त न्यूज चे संपादक आहेत व गडचिरोली येथील नामांकित पत्रकार आहे. निष्पक्ष निर्भीड व अभ्यासू पत्रकार अशी स्वातंत्र्य ओळख निर्माण केली असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, क्रीडा व कृषी साहित्य, धार्मिक, क्षेत्रात त्यांनी सातत्याने लिखाण केले व अनेक प्रकरणांना त्यांनी वाच्याता फोडली आहे. त्यांचे पत्रकारितेतील कार्य प्रेरणादायी आहे. नुकताच त्यांनी ६ जानेवारी २०२३ ला पत्रकार दिनाचे औचित्य साधून डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा येथोचित सत्कार सोहळा व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर परिचर्चा घडवून आणले व डिजिटल मीडियात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला.

विमा कवच व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर महाराष्ट्र अभ्यास दौरा नियोजन करून आयोजन केलेले आहे. कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या समस्येला लढा देण्याचे त्यांच्या कार्याची दखल घेत माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्यूज तर्फे यावर्षीचा डिजिटल मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातून निलेश जीवनदास सातपुते यांना जाहीर केला आहे.

सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल होमदेवजी तुम्मेवार महाराष्ट्र मत न्यूज २४ तास संपादक, मित्रपरिवार, पत्रकार, डिजिटल मीडिया संपादक, व विविध स्तरातून तसेच मीडियामध्ये कार्यरत असलेल्या आदींकडून निलेश सातपुते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.