महाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर,शाळात शुकशुकाट

गडचिरोली,प्रतिनिधी :-

राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे महामंडळ यांच्या पत्रानुसार व महामंडळाचे सहकार्यवाहक शिवाजी खांडेकर, व अध्यक्ष अनिल माने यांच्या आदेशानुसार दिनांक 14 मार्च 2023 रोजी बेमुदत संप राज्यभर सुरु आहे.यात गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघ,गडचिरोली च्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा बंद संपात सहभागी झाले. सर्व  शाळात शुकशुकाट होता.

जिल्ह्या मुख्यालयी आज राजकुमार निकम,शिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या मार्फत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुपारी चार वाजता निवेदन पाठवण्यात आले.

सदर संपात शिक्षकेत्तर यांच्या प्रमुख मागण्या

(१) नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.

(२) गडचिरोली जिल्ह्यात शिक्षक/ शिक्षकेतर रिक्त पद भरती सुरू करण्याबाबत.

(३)  गडचिरोली जिल्ह्यात १०,२०,३० लाभाची योजना सुरू करणे बाबत.

(४) कंत्राटीकरण रद्द करून कायमस्वरूपी चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती सुरू करणे               बाबत करण्यात आले.

निवेदन देते वेळी  जिल्हा अध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते,कार्याध्यक्ष संदीप भरणे,नंदलाल लाडे, प्रमोद पाटील येलमुळे,अरुण धोडरे,अभिजित शिवणकर,भूपेश वैरागडे,शशांक देशमुख,दिलीप बानबले,ऋषी वासेकर आदी शिक्षकेत्तर उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.