आरोग्य व शिक्षण

गडचिरोली शहरावर अज्ञात रोगाचे सावट, २५० डुकरांचा मृत्यू ?

उदय धकाते

गडचिरोली :-

गडचिरोली शहरावर अज्ञात रोगाचे सावट आल्याने जवळपास २०० ते २५०  डुकरांचा मृत्यू झाला आहे. सदर मृत्यूचा आकडा दिवसेदिवस वाढत असल्याने नगर प्रशासनच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

मागील आठवड्यापासून शहरातील डुकरांचा मृत्यू चा सिलसिला सुरु असून हा थांबत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरातील सर्व भागात रोज १५ ते २० डुकरांचा मृत्यू होत आहे. काही महिन्यापूर्वी राज्यात गुरा वर लम्पी हा रोग आला होता. या पूर्वी कोंबड्यावर बर्ड फ्लू रोग आला होता.

आता डुकरावर कोणता रोग आला आहे याचे अद्याप निदान झाले नाही. या बाबत आज महाभारत न्यूज ने नगर परिषद मध्ये जाऊन प्रत्यक्ष जाऊन भेट दिली असता.वरील आकडा मिळाला असून या बाबत पशुवैद्यकीय रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आले असून त्यांनी मृत्यू पडलेले एकाही वराह चे उत्तरीय तपासणी केलेली नाही,अशी माहिती मिळाली.

वराह पालन व्यवसाय करणारे यांच्या माहिती नुसार विदर्भ सह,छतीसागड, आंध्रप्रदेश,तेलंगाना येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात डुकरांचा मृत्यू होत आहे.याचे कारण मात्र त्यांनी सांगण्यास नकार दिला आहे.डुकरांचा मृत्यू मोठ्या प्रमाणांत होत असतांना जिल्ह्याचे आरोग्य विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. हे विशेष.

उद्या नगर परिषद गडचिरोली च्या आरोग्य विभागाने स्वतः पुढाकार घेऊन उत्तरीय तपासणी करणार आहे.मृत्यू पावलेले डुकरांना उचलण्यासाठी वाहन कमी पडत आहे.

कारगील चौकातील दृश्य

या बाबत वराह पालन व्यवसाय करणारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा त्यांचा कडे बंदिस्त असलेले वराह रोज  मृत्यू मुखी पडत असल्याचे सांगितले.परन्तु त्यांनी मात्र नेमका आकडा सांगण्यास नकार दिला आहे.या मुळे मृत्यू मुखी पडल्याचा आकडा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे.हे सिद्ध होते. 

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.