आरोग्य व शिक्षण

गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील औषध खरेदी घोटाळा

औषधी निर्माण अधिकारी महेश देशमुख निलंबित

गडचिरोली, प्रतिनिधी –

जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे २०१९ पासून सुरू असलेल्या औषध खरेदीतील आर्थिक अनियमिततेप्रकरणी बहुचर्चित औषधी निर्माण अधिकारी महेश प्रभाकर देशमुख यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.

आरोग्य सेवा नागपूरच्या उपसंचालकांनी दिनांक १६ जुलै रोजी निलंबनाचे आदेश काढले असून, याप्रकरणातील चौकशीसाठी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.

या प्रकरणात वारंवार तक्रारी होत होत्या. तक्रारींची गंभीरता लक्षात घेता, त्या पालकमंत्री व सहपालकमंत्री यांच्याकडे पोहोचल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशी अहवालात आर्थिक अनियमिततेची शक्यता स्पष्टपणे नमूद करण्यात आली होती.

त्यानंतर सहसंचालक, अर्थ व भांडार, आरोग्य सेवा, मुंबई यांनी स्वतंत्र तपासणी केली. तपासात आर्थिक गैरव्यवहार स्पष्ट झाल्याने नियुक्त प्राधिकाऱ्यांनी औषधी निर्माण अधिकारी महेश देशमुख यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले.

हा निर्णय प्रशासनातील पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker