आपला जिल्हा

१५ % प्रोत्साहन भत्ता, २४ जुलै पर्यत मिळण्याची शक्यता 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

राज्य कर्मचाऱ्यांच्या थकबाकी वेतन देयकांसाठी कोषागार अधिकाऱ्यांची भेट; २४ जुलैपर्यंत सकारात्मक निर्णयाची ग्वाही आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ गडचिरोली जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाला देण्यात आली.

राज्य शासनाच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतनावर १५% प्रोत्साहन भत्ता लागू करून सुमारे २३४ महिन्यांच्या फरकाची थकबाकी सह कोषागार कार्यालयात आलेल्या वेतन देयकांना मंजुरी देण्यात यावी, यासाठी आज जिल्हा कोषागार अधिकारी लिंगलोड यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने भेट घेऊन विविध पुराव्यांसह सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेदरम्यान मा. उच्च न्यायालयाचा निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचे पत्र, आदिवासी विभागाचे निर्देश आणि तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी दिलेले मार्गदर्शक पत्र यांचे संदर्भ देत वेतन देयके मंजूर करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

या संदर्भात जिल्हा कोषागार अधिकारी लिंगलोड यांनी २४ जुलै २०२५ पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रतिनिधींना दिले.

या बैठकीत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, कृषी पर्यवेक्षक संघटनेचे राज्य सहसचिव विजय पत्रे, महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम, कार्याध्यक्ष राजु कोडाप, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लतिफ पठाण तसेच वन विभागाचे सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक निरंजन उमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या निर्णयामुळे अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, लवकरच न्यायालयीन निर्णयाच्या आधारे योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker