ताज्या घडामोडी

सामान्य रुग्णालयात दारूचा महापूर

उदय धकाते

 गडचिरोली,प्रतिनिधी :-

जिल्हा मुख्यालयी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे दारूचा महापूर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी आहे.परंतु जिल्हा रुग्णालय येथे मात्र दारू पिणाऱ्याना बंदी नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील रोज हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात.या रुग्णालयामधील ओपीडी मध्ये रोज शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सोबत येत असतात. ओपीडी च्या बाजूला असलेल्या वतार पंप जवळ व अन्य ठिकाणी  रोज शेकडो च्या संख्येने दारू च्या रिकाम्या बाटल्या आढळून येत असून या कडे सामान्य रुग्णालय च्या प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ओपीडी जवळ चे दृश्य

आज या रुग्णालयातील हि गंभीर परिस्थिती आढळून आली आहे. दोन दिवसापूर्वी याच रुग्णालयातील एक कर्मचारी हा अति मद्यसेवनाने मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. सदर कर्मचारी हा जिल्हा सामान्य रुग्णालय च्या आवारात दारू पिऊन पडून होता. नेहमी दारू पीत असल्याने त्याच्या कडे दुर्लक्ष करण्यात आले. सदर व्यक्तीला पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा सामान्य रुग्लालय येथे सुरु आहे.

सदर रुग्णालय मधील हा धक्कादायक व्हिडीओ पुढे आला असून तो वाचकांनी पुढील लिंक वर पहावे.

या रुग्णालय मधील सदर प्रकार उघडकीस येऊन येथील प्रशासन कोणती कारवाई करते या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

 

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker