आपला जिल्हाताज्या घडामोडी

अखेर सामान्य रुग्णालयात साफ सफाई

 महाभारत न्यूज चा दणका

उदय धकाते

गडचिरोली,प्रतिनिधी :-

जिल्हा मुख्यालयी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे दारूचा महापूर आल्याचे बातमी काल महाभारत न्यूज ने प्रकाशित करताच एकाच खळबळ उडाली. आज संपूर्ण रुग्णालयाची साफ सफाई चे काम हाती घेण्यात आले. अनेक ठिकाणी देशी विदेशी रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या आहे. या बाटल्या सोबत अनेकांचे जाळे विणल्या गेले आहे याची कर्मचारी वर्गात खमंग चर्चा सुरु आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी आहे.परंतु जिल्हा रुग्णालय येथे मात्र दारू पिणाऱ्याना बंदी नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे महाभारत न्यूज ने पुढे आणला आहे.वृत्त प्रकाशित होताच आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी गंभीर दखल घेत कर्मचारी यांची परेड घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता हा भाग स्वच्छ करण्यात आला. कालचा फोटो

सदर या रुग्णालयात  दारू पार्टी येथे राजरोस पणे सुरु असल्याच पुढे येत असून यात काही अधिकारी वर्गाचा वरदहस्त आहे.अनेक कर्मचारी हे दारू पिऊन आपल्या कर्तव्यावर हजर असतात.या बाबत महिला रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवायाकानी फटकारले परंतु याचा काहीही परिणाम झाला नाही. काहींनी महाभारत न्यूज कडे हि माहिती दिल्याने काल या बाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील रोज हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. या रुग्णालयामधील ओपीडी मध्ये रोज शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सोबत येत असतात.

कालचे दृश्य बघा पुढील लिंक वर

आज ओपीडी च्या बाजूला असलेल्या वतार पंप जवळ व अन्य ठिकाणी  रोज शेकडो च्या संख्येने दारू च्या रिकाम्या बाटल्या आढळून येत असून या कडे सामान्य रुग्णालय च्या प्रशासनाचे येथे स्वच्छता केली आहे.

भाग स्वच्छ करण्यात आला. कालचा फोटो

दोन दिवसापूर्वी याच रुग्णालयातील एक कर्मचारी हा अति मद्यसेवनाने मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. सदर कर्मचारी हा जिल्हा सामान्य रुग्णालय च्या आवारात दारू पिऊन पडून होता. नेहमी दारू पीत असल्याने त्याच्या कडे दुर्लक्ष करण्यात आले.

सदर रुग्णालय मधील हा धक्कादायक व्हिडीओ पुढे आला असून तो वाचकांनी पुढील लिंक वर पहावे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.