आरोग्य व शिक्षण

जिल्ह्यातील सिकलसेलग्रस्त ११ जूनला शिबिर

गडचिरोली,प्रतिनिधी :-

सार्वजनिक आरोग्य विभाग गडचिरोली व अनुराधा पौडवाल यांच्या सर्योदया फोंडेशन मार्फत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. ११ जून २०२३ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सिकलसेल ग्रस्त (SS) रुग्णांचे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदर शिबीराकरीता फोंडेशन मार्फत डॉ. अनुराधा श्रीखंडे President, Sickle cell Association Nagpur या Technical Expert म्हणून टीम या शिबीराचे काम पाहणार आहेत. दि. ११ जून २०२३ ला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सदर शिबीराचे आयोजन करण्यात येत आहेत.

सदर शिबीरामध्ये रुग्णांची (CBC, LFT, KFT, HB) सिरम थेरपी, तपासणी करण्यात येत आहे. तसेच आवश्यक औषधी व Tab. Hydroxyurea वाटप करण्यात येत आहे. तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांचे कडून सिकलसेल ग्रस्त रुग्णांची तपासणी करून औषधोपचार बाबत मदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व सिकलसेल ग्रस्त (SS) रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णलय गडचिरोली यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.