क्राईम

गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली, प्रतिनिधी :-

 गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे जवळ माओवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात करण्याच्या उद्देशाने तळ उभारले होते.हातळ गडचिरोली पोलिसांच्या सि -60 जवाननाणी उध्वस्त केले. हे तळ उध्वस्त झाल्याने नक्षल चळवळला जबर हादरा पोलिसांनी दिला आहे.

या भागात नक्षलवादिनी तळ उभारल्याची विश्वसनीय माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली.

या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे सुमारे 200 जवानांचे विशेष अभियान काल संध्याकाळी राबवण्यात आले. आज (दि. 12/05/2025) सकाळी सदर जंगल परिसरात शोध घेत असताना माओवादी संघटनांनी पोलिसांवर हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला. सी-60 जवानांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती.

चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान खालील प्रमाणे मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांचा शस्त्रासाठा जप्त करण्यात आला:

एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, एक रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जर इ. मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू आढळून आले.

सदर माओवादी तळ सी-60 जवानांनी पूर्णतः उद्ध्वस्त केला आहे. चकमकीत काही माओवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असून त्यांना इतर माओवाद्यांनी जंगलात नेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या भागात अजूनही ऑपरेशन सुरु असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker