आपला जिल्हा

अखेर 40 नव्या बस आगारात दाखल अ.भा. ग्रा.पं च्या प्रयत्नांना यश

भंगार बस च्या जागी नव्या कोऱ्या बस धावणार अ.भा. ग्रा.पं. ची मागणी पूर्ण

गडचिरोली, प्रतिनिधी:-
गडचिरोली आगारातील भंगार बसेस बंद करण्यात आल्याअसून ४० नव्या बसेस आता रस्त्यावर धावू लागल्या आहेत. भंगार बसेस बंद करा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोली जिल्हा ने डिसेंबर २०२४ ला केली होती.

विभागीय नियंत्रक रा.प.मं. गडचिरोली यांना भंगार अवस्थेत असलेले बसेस बंद करण्याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने अनेक प्रवासी, ग्राहक यांच्या तक्रारी नंतर राज्य परिवहन महामंडळास निवेदन देण्यात आले होते.गडचिरोली व सर्व तालुक्यातील प्रवासी ग्राहक तसेच शालेय मुला/मुलींच्या असुरक्षिततेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. पण बहुतांश भंगार अवस्थेतील बसेस आहे. काही प्रवासी ग्राहकांचे जीव धोक्यात आणणारे प्रवास होतआहे. त्यामुळे नागरिकांचा व शाळेतील मुला/मुलींचा आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न जैसे थेच असून हा गम्बीर विषय झालेला आहे.याची दखल घेत भंगार बसेस बंद करण्याची मागणी होती.

अखेर 40 नव्या बस आगारात दाखल अ.भा. ग्रा.पं च्या प्रयत्नांना यश

भंगार बस च्या जागी नव्या कोऱ्या बस धावणार अ.भा. ग्रा.पं. ची मागणी पूर्ण

प्रवासी ग्राहकांचा प्रवास सुखकर….

आपल्या जिल्ह्यातील हजारो प्रवासी तसेच शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना अश्या प्रकारे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भंगार बसेस चा हा गंभीर विषय झाला आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना व विध्यार्थ्यांना होत होता, तसेच आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने एक छोटासा निर्णय म्हणून आपल्या आगारात नवीन बसेस करिता तात्काळ उपाय योजना करून हजारो प्रवासी ग्राहकासाठी 40 नव्याकोऱ्या बसेस सुरू करून गडचिरोलीच्या प्रवासी ग्राहकांची आनंदाने आता प्रवास सुखकर होईल त्यात मुळीच शंका नाही.
४० नव्या बसेस गडचिरोली आगारात दाखल होऊन ते रस्त्यावर धावू लागल्यामुळे विभागीय नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, सचिव उदय धकाते, संघटक विजय कोतपल्लीवार,अरुण पोगळे यांनी आभार मानले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker