आपला जिल्हाक्राईम
शिवणी येथे कर्णबधीर युवती वर अत्याचार,प्रकृती चिंताजनक

उदय धकाते
गडचिरोली :-
गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथे काल संध्याकाळच्या सुमारास एका २३ वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला असून सदर युवती ला भीषण मारहाण करण्यात आली असल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याने काल रात्रीच तिला नागपूरला पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले.सदर युवती हि कर्ण बधीर आहे.
हि युवती या घटनेमुळे हादरून गेल्याने ती बोलू शकत नव्हती या युवतीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेली असल्याने तिला बोलता येणे शक्य नव्हते.
सदर युवती हि गरीब घरची असून तिला ती शारीरिकरित्या अशक्त असल्याची माहिती आहे.या युवतीला रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे गंभीर अस्वस्थेत उपचार करिता दाखल करण्यात आले.या वेळी महिला पोलिसासह काही अधिकारी रुग्णालयात पोहचले होते.
वृत्त लिहीपर्यंत अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही आहे.या घटनेने शिवणी हे गाव आणि जिल्हा हादरून गेले आहे.
या घटनेची पीडित युवतीच्या आदिवासी समाजाने गंभीर दखल घेतली असून पदाधिकारी अत्याचार करणाऱ्या नराधमवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यासाठी हे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी पोलीस मुख्यालयात वृत्त लिहीपर्यंत ठाण मांडून बसले आहेत.



