क्राईम

हत्तीची छेड काढणे तरुणांच्या अंगलट

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्तीकॅम्पमधील हत्तीण मंगला हि रस्ता ओलांडत असताना तिच्या जवळ काही युवकांनी जाऊन छेड काढणे त्यांच्या अंगलट आले. तरुणाच्या या अशोभनीय कृत्याने संतापलेल्या मंगलाने थेट त्याच्यावर हल्ला चढवला यात दुचाकी वाहनाचा तिने चेंदामेंदा केला, मात्र यात युवक थोडक्यात बचावला.

 गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील प्रसिद्ध असलेले एकमेव हत्तीकॅम्प अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे आहे. येथील कॅम्पमध्ये ८ हत्ती आहेत. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील हत्तींना मुक्त विहारासाठी लगतच्या जंगलात सोडण्यात येतात. शनिवारी येथील हत्तीण मंगला कमलापूर-दामरंचा मार्गावर असताना काही युवक  तिच्या जवळ जाऊन आवाज व हातवारे करून छेड काढण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी संतापलेल्या मंगलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात युवक थोडक्यात बचावले पण त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला.

या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने हत्तीच्या जवळ जाऊन छेड काढणाऱ्या सदर युवकांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. हत्तीकॅम्पमधील हत्ती कुणावर हल्ला केल्याची घटना दुर्मिळ असल्याचे बोलले जात आहे.

https://twitter.com/mahabharatnews3/status/1672974537238155265?t=_pk8RaBplzRMstelYZj0QQ&s=19

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.