राजकीय

गडचिरोली शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा समिती जाहीर

भाई रामदास जराते, जिल्हा चिटणीस, तर भाई शामसुंदर उराडे, जिल्हा खजिनदार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

भारतीय शेतकरी कामगार पक्षाची  गडचिरोली जिल्हा समिती जाहीर करण्यात आली असून जिल्हा चिटणीस पदावर भाई रामदास जराते तर  भाई शामसुंदर उराडे यांची जिल्हा खजिनदार म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.

येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या मान्यतेने मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे यांनी नवीन जिल्हा समिती जाहीर केलेली आहे.

शेकापच्या नव्या जिल्हा समितीमध्ये बोरी (चामोर्शी) चे माजी सरपंच संजय दुधबळे, नागरवाही  (आरमोरी) चे रोहिदास कुमरे यांची जिल्हा सहचिटणीस म्हणून वर्णी लागली आहे.

दामोदर रोहनकर, फराडा (चामोर्शी), श्रीकृष्ण नैताम, चामोर्शी, डॉ.गुरुदास सेमस्कर, गडचिरोली, पांडुरंग गव्हारे, कुनघाडा (चामोर्शी), उपसरपंच तुळशीदास भैसारे, मेंढा (गडचिरोली), ग्रा.प.सदस्य तुकाराम गेडाम, पुलखल (गडचिरोली), गंगाधर बोमनवार, मोहुर्ली (चामोर्शी) यांची शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी परिषदेच्या वतीने जिल्हा समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा समितीवर नियुक्ती करण्यात आलेल्यांमध्ये सुधाकर आभारे, मरेगाव ( गडचिरोली), रमेश चौखुंडे, सगणापूर ( चामोर्शी), अशोक किरंगे, नागरवाही (आरमोरी), बाजीराव आत्राम, पंदेवाही (एटापल्ली), वसंत लोहाट, जांभळी (धानोरा), प्रविण दुर्गे (अहेरी)  यांना संधी देण्यात आली आहे. तर तितिक्षा डोईजड यांना महिला प्रतिनिधी आणि भाई अक्षय कोसनकर यांची युवक प्रतिनिधी म्हणून जिल्हा समितीवर वर्णी लागली आहे.

नवनियुक्त जिल्हा समिती आणि पदाधिकाऱ्यांचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे, महिला राज्याध्यक्ष आशाताई शिंदे, युवक आघाडीचे राज्याध्यक्ष बाबासाहेब देशमुख, आमदार शामसुंदर शिंदे,  मध्यवर्ती चिटणीस मंडळाचे सदस्य माजी आमदार संपतबापू पवार पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, प्रा.एस.व्ही. जाधव, बाबासाहेब कारंडे, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, चंद्रकांत चव्हाण, चित्रलेखा पाटील, जयश्री वेळदा, सरपंच दर्शना भोपये, सरपंच सावित्री गेडाम यांचेसह जिल्हा शेकाप परिषद आणि गाव शाखांचे पदाधिकारी,  कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.