आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

 गडचिरोली,प्रतिनिधी :-  

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. यात 21 जुलै रोजी रेड तर 22 जुलै रोजी ऑंरेंज अलर्ट असून या कालावधीत जिल्ह्या   विजांच्याम कडकडाटासह वादळ मुसळधार पाऊस होण्यौची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता व्यैक्तय केली आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्यार आणि दरवाज्यापासून दूर रहा. रोडवे, अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा. खराब दृश्यवमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याखचा प्रयत्नत करू नका. पाणी दिसते त्या पेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्यालत मोडतोड तीक्ष्ण  किंवा धोकादायक वस्तू्, भांडे, छिद्र किंवा विजेच्या तारा असु शकतात. पॉवर लाईन्से किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा.

            वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना  काय करावे आणि काय करु नये विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असतांना फोनचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहु नका.   जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. जिल्ह्या तील नागरिकांनी उचित काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker