आपला जिल्हा

गडचिरोली नगरपरिषद निवडणुक कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण संपन्न

गडचिरोली, प्रतिनिधी :-

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडले.

या प्रशिक्षणासाठी नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीसाठी आयोजित या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणात — निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याने सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, कोणत्याही प्रकारच्या चुका टाळण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

तसेच, एकमेकांना सहकार्य करीत टीमभावनेने काम केल्यास निवडणूक प्रक्रिया अधिक सुकर आणि प्रभावीपणे राबवता येईल, असेही प्रशिक्षकांनी सांगितले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker