आपला जिल्हा

जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची सभा संपन्न

गडचिरोली,प्रतिनिधी :-
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांचे वतीने आज दिनांक 21 जुलै2023 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची सभा घेण्यात आली.

अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंता तसेच सभेस प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक/प्राचार्य उपस्थित होते. सभेमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची कार्ये सांगितले. यावेळी गडचिरोली जिल्हा स्कुल बस सुरक्षेच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये स्कुल बसच्या ब्रेकची रोज तपासणी करण्यात येऊन बसमध्ये पॅनीक बटन बसविण्यात यावी, विद्यार्थ्यांची वाहतुक करणा-या सर्व वाहनांवर वाहन चालक, वाहक, मुख्याध्यापक यांचे नांव व मोबाईल नंबर लिहणे.

मुख्याध्यापक, वाहन चालक, विद्यार्थ्यांचे पालक यांचा व्हॉट्स अप ग्रुप तयार करण्यात यावा, मानव मिशनच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना बसमध्ये अग्रकम देण्यात यावा. तसेच बसवर शाळा फेरी अशी पाटी लावण्याची सुचना देण्यात आली. सर्व शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना करण्यात यावी. अशाप्रकारे सुचना देण्यात आल्या.

यावेळी गडचिरोली जिल्हयासाठी मानव विकास मिशन यांना 50 बसेस ची मागणी करण्यात आल्याचे विभागनियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली यांनी सांगितले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.