आरोग्य व शिक्षण

गडचिरोलीत शौचालयात घाणीचे साम्राज्य लाखो रुपये पाण्यात

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

गडचिरोली नगरपरिषद अंतर्गत मच्छी मार्केट जवळील तलाव परिसरात गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने लाखो रुपये खर्चून नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात आले. नगरपरिषदेने बांधलेल्या शौचालय बांधकामाची अतिशय दुरव्यवस्था झालेली असून संडासात पायसुधा ठेवायची इच्छा होत नाही अशी स्थिती झालेली आहे.

या ठिकाणी संडासाला लावलेले सम्पूर्ण दरवाजे सुद्धा गाहाळ  झालेले असून  संडासात बसविलेल्या संपूर्ण शिटा घाणेने डब्बलबल्या असून शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गेंधी सुद्धा सुटलेली असल्यामुळे सार्वजनिक संडासात पाय ठेवायची सुद्धा हिंमत होत नाही.

 नगरपरिषदेने सार्वजनिक संडास बांधकामावर लाखो रुपये खर्च केलेले असून सम्पूर्ण संडास व संडासावर येणारा खर्च भुईसपाट होण्याच्या  मार्गावर आहेत. या झालेल्या शौचालंय बांधकामाला आणि दुर्व्यावस्थेला  जबाबदार कोण ?

शौचाललंय बांधकामावर देखरेख करणारे संबंधित अभियंता व मुख्याधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुडे हेच जबाबदार असून यांच्या दुर्लक्षपणामुळे कोंबडी बाजार परिसरसतील  सार्वजनिक संडासची ही भयानक अवस्था  शहरातील नागरिकांच्या डोळ्यासमोर अनुभवास मिळत आहे.

संडास बांधकामावर झालेला खर्च हा अभियंता आणि मुख्य अधिकारी यांच्या वेतनातून कपात करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व संयोजकविदर्भ माहामचं आघाडी गुरुदेव भोपये यांनी  केली आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.