गडचिरोली, प्रतिनिधी :-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून एकूण 11 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले. यामुळे आता आरमोरीतून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.
67-आरमोरी मतदारसंघातून माधुरी मुरारी मडावी, वामन वंगनुजी सावसाकडे, निलेश देवाजी हलामी आणि रमेश गोविंदा मानागडे या ४ उमेदवारांनी
68-गडचिरोली मतदार संघातून आसाराम गोसाई रायसिडाम, डॉ. देवराव मादगुजी होळी, मोरेश्वर रामचंद्र किनाके, वर्षा अशोक आत्राम, विश्वजीत मारोतराव कोवासे या 5 उमेदवारांनी
69- अहेरी मतदारसंघातून अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम व आत्राम अजय मलय्या या 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
Back to top button