क्राईम

धमकी देणाऱ्या आरोपीस 2 वर्ष 6 महिने सजा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

ग्रामपंचायत चिचटोला येथील रेकॉर्ड नेऊन जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस 2 वर्ष 6 महिने सजा व 12,000/- रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी ठोठावली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 10/07/2018 रोजी सकाळी 09.00 वा. च्या सुमारास आरोपी नामे अरुण सिंद्राम, रा. चिचटोला याने ग्रामपंचायत कार्यालय, चिचटोला येथील ग्रामपंचायत शिपाई नामे युनुस गौस मोहम्मद शेख याला शिवीगाळ करुन रेकॉर्ड घेऊन गेले. तसेच रेकॉर्ड घेऊन गेल्याचे ग्रामपंचायत शिपाई याने यातील फिर्यादी नामे कु. तुळशी शिवलाल उईके, सरपंच हिला फोनव्दारे कळविले. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करुन ग्रामपंचायत रेकॉर्ड घेवुन नदीच्या पाण्यात फेकुन देतो, असे बोलुन खुन करण्याची धमकी दिली व रेकॉर्ड घेवुन निघुन गेला. त्यानंतर फिर्यादी व ग्रामसेवक श्री बरडे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य यांना झालेल्या घटनेबाबत माहीती दिली.

फिर्यादी ही ग्रामसेवक बरडे सह मौजा चिचटोला येथे जात असतांना चिचटोला गावातील रोडवर आरोपी कुन्हाड घेवुन ऊभा होता फिर्यादी व बरडे, निकीता मडावी, हे कार्यालयात बसून असतांना यातील आरोपीने आपले रॉकेलची कॅन घेवुन कार्यालयात आला व ऑफिस आणि तुम्हाला जाळुन टाकतो असे म्हणुन फिर्यादी व बरडे यांचेवर रॉकेल टाकुन माचिस घेतली तेव्हा उपसरपंच मच्छिरके, शिपाई शेख यांनी त्याला पकडले असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे कुरखेडा येथे अप क्र. 109/2018 कलम 307, 380, 504, 506 (2), 353 अन्वये गुन्हा नोंद केला. 

सदर घटनेचा पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप दाखल केले असता, से.के. क्र. 13/2019 अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून आज दिनांक २५/07/2023 रोजी आरोपी नामे अरुण फागुवा सिंद्राम, वय ४० वर्ष, रा. चिचटोला, ता. कुरखेडा याला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम ३८० भादवी मध्ये 1 वर्ष, 5000/- रुपये दंड, कलम ३५३ भादवी मध्ये 1 वर्ष 5000/- रुपये आणि कलम ५०६ भादवी अन्वये 6 महीने 2000/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 

सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील  कुंभारे यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्हाचा तपास तत्कालीन पोउपनि / विजय तुरपद वनकर, पोस्टे कुरखेडा यांनी केले तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.