देश विदेश

गडचिरोलीत कारगील शहिदाना  आदरांजली

गडचिरोली, प्रतिनिधी :-

आज कारगील चौक गडचिरोली येथेकारगील शहीदनां आदरांजली आणि  विजय दिवस साजरा करण्यात येणार आला.

सन १९९९ ला कारगील येथे भारत पाकिस्तान यांचे युद्ध झाले होते. या युद्धात भारतीय शूरवीर सैनिकांनी प्राणाची बाजी लावून पाकिस्तानचा पराभव केला होता. या युद्धात शूरवीर सैनिकांनी बलिदान देशासाठी दिले होते त्यांच्या स्मृति कायम राहावी म्हणून कारगील विजय दिन देशभरात मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.

गडचिरोली शहरातील मागील २४ वर्षापासून कारगील विजय दिवस नित्यनेमाने कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो. त्यांच्याच पुढाकारने गडचिरोली शहरात कारगील स्मारक ची निर्मिती करण्यात आली आहे.

भर पावसात विजय दिन कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली च्या वतीने साजरा करण्यात येणार आला. यावेळी नागरिक, युवक उपस्थित राहून देश भक्त शहीद सैनिकांना आदरांजली दिली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर,मार्गदर्शक नरेंद्र चन्नावार, सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर, दिलीप माणुसमारे, विलास जुवारे,सुनील बावणे, निखिल मंडलवार,विजय लोणार, रुपेश सलामे, महेंद्र मसराम, राजू डोंगरे आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.