सामाजीक

झाडीबोली साहित्य मंडळातर्फे नाटककार वडपल्लीवार गुरुजी यांना‌ श्रद्धांजली अर्पण

गडचिरोली,प्रतिनिधी :-

       झाडीप्रदेशातील ज्येष्ठ नाटककार तथा झाडीबोली साहित्यिक गणपती वडपल्लीवार गुरुजी म्हणजे झाडीपट्टी साहित्य व  समृद्ध कला संस्कृतीचा वारसा पुढे नेणारे समर्पित व्यक्तिमत्व होते. आपल्या झाडी मायबोलीचा  प्रचार प्रसार ते नाटकाच्या माध्यमातून निरंतर करीत असे. एकंदरीत त्यांचे झाडी रंगभूमी, कला संस्कृती समृद्ध करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले ,असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.

     झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने झाडीपट्टीतील ज्येष्ठ नाटककार दिवंगत गणपती वडपल्लीवार गुरुजी  यांना आभासी पध्दतीने भावपूर्ण श्रद्धांजली  अर्पण करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. 

       या सभेत झाडीबोली साहित्य मंडळाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष कवी अरूण झगडकर,  राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे डॉ . प्रा. श्रावण बाणासुरे (बल्लारपूर), महाभारत  न्युज  चे पत्रकार उदय धकाते,गडचिरोली, चंद्रपूर शहर शाखेचे डॉ. धर्मा गांवडे, प्रा. नामदेव मोरे, नामदेव  गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळाचे कवी उपेंद्र रोहणकर, सरचिटणीस  रामकृष्ण चनकापुरे आदी मान्यवर  प्रामुख्याने उपस्थित होते.

   वडपल्लीवार गुरुजींनी झाडीपट्टीभागात नाट्य क्षेत्रासह शिक्षण,कला,सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी झटले, असे मनोगत उदय धकाते यांनी व्यक्त केले.

तर मरी मायचा भूत्या यासारख्या शेकडो  नाटकाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने जनतेचे प्रबोधन करण्याचे काम वडपल्लीवार गुरुजींनी केले,असे प्रतिपादन अरूण झगडकर यांनी केले.

प्रा. डॉ. बानासुरे आणि  डॉ.धर्मा गांवडे यांनी वडपल्लीवार गुरुजींचे झाडीबोली साहित्य क्षेत्रातील योगदान यावर प्रकाश टाकला . कवी रोहणकर यांनी नाटककार वडपल्लीवार गुरुजींच्या आठवणी सांगितल्या.

     या श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक अरूण झगडकर यांनी केले तर तंत्रनियोजन व  आभार प्रदर्शन रामकृष्ण चनकापुरे यांनी केले. सभेत आभासी पध्दतीने अनेकजण सहभागी झाले होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.