आपला जिल्हा

आज शहरातील मुख्य चौकात आदिवासी विद्यार्थ्यांचे तीव्र आक्रोश आंदोलन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

        शासनाने तलाठी भरती चा जीआर बदलून पेसा अंतर्गत आलेल्या जागांमध्ये घट करून आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे सुरुवातीला निघालेल्या जागा त्या पूर्ववत करण्यात याव्या या मुख्य मागणी सह इतर अनेक मागण्यांसाठी आदिवासी व इतर समाजातल्या विद्यार्थ्यांकडून आज तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.

       27 जुलै 2023 रोजी सकाळी ११ वाजता पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आदिवासी विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेच्या हितसंबंधित शेकडो विद्यार्थी आज या आंदोलनात सहभागी होणार आहेत हे आंदोलन पूर्णपणे कायदेशीर पोलिसांच्या बंदोबस्तात होत आहे.

शासनाने तलाठी भरतीच्या जागा पूर्ववत कराव्यात या मुख्य मागणीसह आम्ही इतर समाजाच्या विद्यार्थ्यांनाही शासनाने न्याय द्यावा याची मागणी लावून धरत आहोत. शिवाय जिल्ह्यातील अकार्यक्षम व जातीचे ध्रुवीकरण करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आम्ही तीव्र निषेध करत आहोत यासाठी जिल्ह्यातून आज शेकडो विद्यार्थी शहरात दाखल होत आहेत इतरही समाजाचे विद्यार्थी कोणताही भेदभाव न करता या आंदोलनात सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.