क्राईमताज्या घडामोडी
‘शूटर’ साथीदारासह अटकेत; २१ लाखांचे दागिने जप्त, तीन घरफोड्या उघड

चंद्रपूर, प्रतिनिधी :-
घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार मो. सरफरोज सगीर शहा उर्फ ‘शूटर’ याला त्याच्या साथीदार सद्दाम मुस्ताक शेख (रा. घुग्घुस) याच्यासह अटक केली. या कारवाईत रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तीन घरफोड्या उघडकीस आणत तब्बल २१ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना दुचाकी चोरी व घरफोडी गुन्हेगारांचा शोध सुरू होता. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर इंदिरानगर परिसरात सापळा रचून सरफरोज शहा याला अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीकडून घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



