राजकीय

शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा युवक आघाडी जाहीर

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शेतकरी कामगार पक्षाच्या युवक आघाडी असलेल्या पुरोगामी युवक संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष पदी अक्षय कोसनकर यांची तर गडचिरोली तालुक्यातील काटली ग्रामपंचायतीचे सदस्य देवेंद्र भोयर यांची यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे यांनी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. सगणापूर (चामोर्शी ) येथील राजू केळझरकर, पोर्ला (गडचिरोली) येथील यशवंत मुरकुटे यांची जिल्हा उपाध्यक्ष तर वडसा तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत गुरनूले, धन्नूर (मुलचेरा) येथील चिरंजीव पेंदाम यांची जिल्हा सहचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. गडचिरोली तालुक्यातील मारकबोडी येथील नितीन मेश्राम यांची सोशल मीडिया जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

 मंगेश येनप्रेड्डीवार, फराडा (चामोर्शी), विनोद उराडे, गडचिरोली, महेंद्र जराते, पुलखल (गडचिरोली), विठ्ठल पिपरे, बोदली (गडचिरोली), बाबुलाल रामटेके, कुरखेडा, आविष्कार गड्डमवार, एट्टापल्ली, सुरज ठाकरे, आरमोरी, रवि चेर्लावार, आलापल्ली (अहेरी), प्रल्हाद पोरेटी, पांढरसडा ( धानोरा), महेश आभारे, मारोडा (चामोर्शी), अंकुश मारभते, गडचिरोली, हिराचंद कोटगले, नगरी (गडचिरोली), नरेश कोसरे, धानोरा, भूषण चिंचोलकर, गडचिरोली यांची जिल्हा युवक आघाडी कार्यकारिणी सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. 

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, रोहिदास कुमरे, जिल्हा समिती सदस्य तुकाराम गेडाम, डॉ.गुरुदास सेमस्कर, रमेश चौखुंडे, गंगाधर बोमनवार, श्रीकृष्ण नैताम, अशोक किरंगे, दामोदर रोहनकर, सुधाकर आभारे, तुळशीदास भैसारे, बाजीराव आत्राम, पांडुरंग गव्हारे, वसंत लोहाट, प्रविण दुर्गे, सरपंच सावित्री गेडाम, सरपंच दर्शना भोपये, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, योगाजी चापले, डंबाजी भोयर, प्रदिप आभारे, रोशन नरुले, अनिमेश बिश्वास,देवराव शेंडे, दिपक मिस्त्री, पवित्र दास, मारोती आगरे, रेवनाथ मेश्राम, गजानन आभारे, रमेश यम्पलवार, अनिल आगरे, भोजराज भोयर, गुलाब ठाकूर, प्रदिप पाल, रमेश ठाकरे, विलास अडेंगवार, रविंद्र बोदलकर, वसंत चौधरी, देवानंद साखरे, अमोल शेरकी यांचेसह अनेकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker