देश विदेश

माओवादीना अनाहृत पत्र…२८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२३

हुतात्मा सन्मान सप्ताह

प्रति,

         माओवादी,

         दंडकारण्य

 

तुम्ही संविधान मानत नाही ना? मग कशाला बाबासाहेबांचे नाव घेता !

माओवाद हा रक्तरंजित इस्लामी दहशतवादाला समर्पक असा पर्याय म्हणून पुढे आला आहे. ज्याप्रमाणे इस्लामी दहशतवाद भारतातून वेगळा झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत आहे, त्याचप्रमाणे तुमच्या माओवादाचा भारताशी तिळमात्र संबंध नाही. भारताला कायम तुसड्या नजरेने बघणाऱ्या चिनचा तुम्हाला आधार आहे. तरीदेखील तुम्ही भारतात स्वतःला आदिवासींचे संरक्षक म्हणून संबोधता आणि त्याच आदिवासी बंधुन्ना पायदळी तुडवत त्यांना विकासापासून दूर ढकलत आहात. तुम्ही वारंवार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता आणि अनेक वेळा संविधानाने घालून दिलेला कायदा मोडून निष्पाप लोकांचा बळी घेता देता.तसेच तुम्हाला बाबासाहेबांचे एकही तत्व मान्य नाही आणि संविधानाला तुम्ही कधीचेच केराच्या टोपलीत टाकले आहे, हे तुमच्या भारतीय संघराज्य विरोधी कृतीतून सातत्याने सिद्ध झाले आहे.

माओवाद्यांनो तुम्हाला भारत, भारतीय संस्कृतीचे कायम वावडे राहिले आहे. भारतीय संस्कृतीचा मूळ आधारच आदिमता, प्राचीनतेत आहे. सर्वसमावेशकता हिच भारतीय संविधानाने-राज्यघटनेने दिलेले समानतेचे सूत्र आहे. तुम्ही हे सूत्र वारंवार पायदळी तुडवत आले आहात. 

तुम्ही माओवाद्यांनो असे काही करता का ?

– तुम्ही दरवर्षी नक्षल शहिद सप्ताह साजरा करता. आता कुठलाही दिवस, सप्ताह, पंधरवाडा हा स्मृतींना उजाळा देणारा, प्रेरणा देणारा, संबंधित व्यक्ती किंवा घटनेला मान- सन्मान देणारा तर कधी निषेध व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो, पाळला जातो. तुम्ही माओवाद्यांनो असे काही करता का? तुमचा कुठलाही सप्ताह दहशतीच्या सावटात पार पडतो. दहशत तुमच्या अस्तित्वाची असते. आदिवासी या काळात कसलाच आनंद साजरा करू शकत नाही, कोणीच घराच्या बाहेर पडू शकत नाही… एक लक्षात ठेवा जेथे भय जास्त काळ वावरतो, तेथे भयाविरुद्ध एल्गार पुकारलाच जातो. याला एक बलाढ्य इतिहास आहे.

आणि तुमचा कसला शहिद सप्ताह ?

– विरश्रीला सलाम करावे, नालायकांना ठेचूनी मारावे… तुम्ही देशविरोधी, संविधानविरोधी, आदिवासीविरोधी, आदिम संस्कृतीविरोधी कृत्य करता. देशाच्या संरक्षणार्थ घरादारापासून दूर रहून कर्तव्यावर असलेले पोलिस, शिक्षण घेऊन मोठे होण्याची स्वप्ने बघणारे आदिवासी विद्यार्थी, दोन-चार पैसे कमावणारे आदिम यांचे गळे कापणारे तुम्ही, लपून वार कारणारे तुम्ही, विकासकामांना तोडणारे तुम्हीच, आदिम संस्कृती उध्वस्त करणारेही तुम्हीच, तुम्ही भेकड आणि तुम्ही विरश्री च्या मिजाशी मारता… हफ्ते मागून स्वतःचा कारभार चालविणारे तुम्ही आणि तुम्ही प्रामाणिकता, भ्रष्टाचार यावर बोलता. तुम्हाला कसलाही अधिकार नाही. तुमची निष्ठा भारताशी नाही. तुम्ही समाजविरोधी आहात. त्यामुळं, तुमचा शहीद सप्ताह बिनबुडाचा आहे. तुमचे शहीद हे उग्रवादी होते आणि अशा राक्षस वृत्तींना ठेचनेच योग्य.

समान नगरी संहितेवर तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही

– समान नागरी संहिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार होते. आणि हा कायदा मान्य होने न होणे, हा पूर्णतः भारताचा विषय आहे. एकीकडे तुम्ही बाबासाहेब आंबेडकर, समानता, आदिवासी, जंगल अशा बाता मारता आणि दुसरीकडे वारंवार तुमची कृत्य केवळ या सगळ्या तत्वांचा अपमान करत असतात. देशद्रोह्यांनी समान नागरी संहिता या विषयावर न बोललेलंच बरे. तुम्हाला तो अधिकारच नाही. तुम्ही माओवादी, तुमचा बाप चिनचा माओ. माओ ने स्वार्थासाठी साध्या चिमण्यांना सोडले नाही, तेथे तुम्हाला मानवता समजणार तरी कशी? तुम्ही, बदंमल करणारे, बदफैली करणारे, चिनमध्ये जशी हुकूमशाही चालते, तिच भारतातही लागू करू पाहणारे तुम्ही… आणि तुम्हाला होय समान नागरी संहिता नकोय. हा कायदा भारत मानणाऱ्यांसाठी, भारतीयत्वासाठीचा आहे. तुमच्याशी त्याचे काही देणे घेणे नाही.

कळतंय ना तुम्हाला, तुमचे कंबर्डे मोडले जातेय ?

– अरे तुमचे साथिच तुमची साथ सोडत चालले आहेत. तुमच्या अत्याचाराला ते कंटाळले आहेत. खंडणीचा पैसा तुम्ही ऐश आरामासाठी खर्च करता आणि रात्रंदिवस तुमच्यासोबत जंगल तुडवणाऱ्यांना त्रास देता, असे तुमचेच साथीदार सांगत आहेत. तुमच्या पूर्व साथीदारांच्या मते, तुम्ही त्यांच्या वैवाहिक आयुष्यावरही निर्बंध आणले आहे. ही मानवतेची हत्याच नव्हे का? तुम्ही त्यांच्याच भावंडांची कत्तल त्यांच्याच हातून करवत असता, हे कधी तरी त्यांना कळणारच आहे. तुमचे कंबर्डे मोडले जात आहे आणि पूढे तर कंबरही उरणार नाही. कारण, मानवता विरुद्ध माओवाद आता साऱ्या जगाला कळायला लागले आहे. तुम्हालाही अजून एक संधी आहे. वेळ अजून गेलेली नाही. परत या. समाजाच्या प्रवाहात सामील व्हा. विरोधंच करायचं असेल तर जरूर करा. परंतु, संवैधानिक लोकशाही मार्गाने. बाबासाहेबांनीच घालून दिलेला हा मार्ग दिला आहे.

जय सेवा

जनसंघर्ष समिती, नागपूर

दंडकारण्य

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker