महाराष्ट्र

गडचिरोलीत आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरात आजी हजारो आदिवासी विद्यार्थ्यांचे आक्रोश जिल्ह्याला बघायला मिळाले. आदिवासी जागेवर शासनाने तलाठी भरती चा जीआर बदलून पेसा अंतर्गत आलेल्या जागांमध्ये घट करून आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे असा आदिवासी विद्यार्थ्यांचा आरोप आहे. 

      शासनाने तलाठी भरती चा जीआर बदलून पेसा अंतर्गत आलेल्या जागांमध्ये घट करून आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे सुरुवातीला निघालेल्या जागा त्या पूर्ववत करण्यात याव्या या मुख्य मागणी सह इतर अनेक मागण्यांसाठी आदिवासी व इतर समाजातल्या विद्यार्थ्यांकडून आज तीव्र आंदोलन करण्यात आले.

       27 जुलै 2023 रोजी सकाळी ११ वाजता पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आदिवासी विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेच्या हितसंबंधित हजारो विद्यार्थी आज या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

शासनाने तलाठी भरतीच्या जागा पूर्ववत कराव्यात या मुख्य मागणीसह आम्ही ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांनाही शासनाने न्याय द्यावा याची मागणी लावून धरली. शिवाय जिल्ह्यातील अकार्यक्षम व जातीचे ध्रुवीकरण करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आम्ही तीव्र निषेध केला. यासाठी जिल्ह्यातून आज हजारो विद्यार्थी शहरात दाखल झाले होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker