आपला जिल्हाराजकीय

साखरी घाट ते मार्कंडा देव च्या पुलाचे बांधकाम करा- नामदेव उसेंडी

गडचिरोली,प्रतिनिधी :-

रस्ते विकास महामंडळ अंतर्गत साखरी घाट ते मार्कंडा देव च्या पुल्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गडचिरोलीचे माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी केली आहे.

           विदर्भातील दक्षिणेची काशी म्हणुन मार्कंडा देवाची ओळख आहे. हे पवित्र स्थान असल्यामुळे लाखो भाविक दरवर्षी महाशिवरात्रीत श्रावण मास व ईतरही वेळी पुजापाठ करण्यासाठी भाविक येत असतात. मार्कंडा देवच्या उत्तरेस चंद्रपूर जिल्हयाचे साखरी हे गाव वसलेले आहे. चंद्रपूर जिल्हयातील बहुतेक नागरीक साखरी मार्गे मार्कंडयाला येत असतात. परंतू पावसाळयामध्ये वैनगंगा नदीला पाणी असल्यामुळे भाविकांनी देवदर्शनासाठी अडचणी निर्माण होतात.

यापुर्वी साखरी ते मार्कंडा वैनगंगा नदीपात्रात छोटासा अर्धवट पुल बांधलेला आहे. त्याचा उपयोग फक्त उन्हाळ्यात होवू शकतो. त्यामुळे पावसाळयामध्ये भाविकांना देवदर्शनासाठी साखरी ते मार्कंडा देव येथे रस्ते विकास महामंडळ अंतर्गत पुल्याचे बांधकामाचे मागणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांनी केलेली आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.