क्राईम

साडेतीन लाखाची पोलिसांनी दारू पकडली

 9,48, 800/- रुपये किंमतीचा दारु मुद्देमाल व वाहन केले जप्त

गडचिरोली,प्रतिनिधी :-

साडेतीन लाख रुपयाची अवैध  दारू गडचिरोली पोलिसांनी आज वाहनासह पकडली असून दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईने दारू विक्रेता मध्ये धडकी बसली असून चंद्रपूर जिल्ह्यातील दारू दुकानदाराची चांदी झाली आहे.यातील एक आरोपी हा चंद्रपूर जिल्ह्यातील पुरवठा करणारा आहे.

  आज गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथके तयार केले. एक पोलीस पथक मुरखळा गावात जाणा­या रस्त्यावर पाळत ठेवले असता, दुचाकी वरुन 28, 800/- रुपये किंमतीच्या 2 बॉक्स विदेशी दारुची वाहतुक करतांना मिळुन आल्याने ईसम नामे अमित यशवंत रोहणकर, वय 25 वर्षे, रा. मोखाडा ता. सावली जि. चंद्रपुर यांस मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेवुन पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

दुसरे पोलीस पथक कोटगल चौकात सापळा रचुन बसले असतांना, एक संशयीत दुचाकी वाहन येत असल्याचे दिसल्याने वाहनाची तपासणी केली. वाहन चालक व मागे असलेल्या ईसमाच्या मध्ये 40 नग विदेशी दारुच्या बाटला मिळुन आल्याने ईसम नामे (1) येलंधर मलय्या गनबोईनवार, वय 47 वर्षे, रा. कनेरी ता.जि. गडचिरोली, (2) विनोद मधुकर मेश्राम, वय 28 वर्षे, रा. पारडी ता. जि. गडचिरोली यांना मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेवुन पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

गडचिरोली कॉम्प्लेक्स परीसरात नाकाबंदी दरम्यान एका संशयीत वाहनास थांबण्याचा ईशारा करताच वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी करुन दरवाजा उघडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांस ताब्यात घेवुन त्याचे व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, वाहनात 2,48,000/- रुपये किंमतीच्या देशी दारुचे एकुण 31 बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी मिळुन आल्याने ईसम नामे आकाश पुरुषोत्तम कापकर, वय 30 वर्षे, व्यवसाय – वाहन चालक, रा. सर्वोदय वार्ड क्रमांक 4, गडचिरोली ता. जि. गडचिरोली याचेविरुध्द पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एकाच रात्रो अशा एकुण वेगवेगळ्या तीन घटनामध्ये 2,88,800/- रुपये किंमतीचा दारु मुद्देमाल व 6, 60,000/- रुपये किंमतीचे दारु वाहतुकीकरीता वापरलेले वाहन असा एकुण 9,48,800/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे, सपोनि राहुल आव्हाड, यांचे नेतृत्वात नापोशि/दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, सतीश कत्तीवार, पोअं/ श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, मंगेश राऊत, चापोना/मनोहर तोगरवार, माणिक निसार यांनी केलेली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker