आपला जिल्हा

जिल्हा कॉंग्रेस तर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली

गडचिरोली,प्रतिनिधी :-

कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना कारगिल चौक गडचिरोली येथील  स्मारकावर गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस तर्फे जेष्ठ नेते डॉ.नामदेव किरसान यांनी  शहीद जवानांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

पाकिस्तानी आक्रमणकर्त्यांना हुसकावून लावत कारगिलची लढाई जिंकल्याची आठवण म्हणून २६ जुलै रोजी देशभरात विजय दिवस पाळला जातो. येथील आठवडी बाजारानजिकच्या कारगिल चौकात उभारण्यात आलेल्या कारगिल स्मारकाच्या ठिकाणी विजय दिवसानिमित्त यावर्षी भर पावसात अनेक मान्यवरांनी शहीद कारगिलविरांना आदरांजली वाहिली.

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या पुढाकाराने या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.दुपारी येथे  काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॅा.नामदेव किरसान, डॅा.नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर,यांच्यासह युवा नेते रजनीकांत मोटघरे,प्रफुल आंबोरकर,रमेश धकाते,नृपेश नंदनकर,हरबा मोरे आदि उपस्थित होते. यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक, युवक यावेळी उपस्थित होते.

गडचिरोली शहरात मागील २४ वर्षापासून कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्यांच्याच पुढाकाराने जिल्हा निधीतून या कारगिल स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.