आपला जिल्हाराजकीय
भाजपला पराभूत करणे हेच ध्येय- प्रागतिक पक्ष
जनविरोधी भाजप सरकार विरोधात लहान पक्ष एकत्र

गडचिरोली,प्रतिनिधी :-
देशात संविधान विरोधी कायदे करण्याऱ्या भाजप सरकार ला रोखण्यासाठी राज्यात प्रागतिक आघाडी तयार करण्यात आली असून हीच आघाडी गडचिरोली जिल्ह्यात नऊ पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात कार्य करील असे आज पत्रकार परिषदेत गडचिरोलीत प्रागतिक पक्षांची आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने त्यांच्या सत्ताकाळात ओबीसी, दलीत, आदिवासींच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचे जनविरोधी काम केले आहे, धार्मिक, जातीय अजेंडा राबवत भांडवलदारांच्या फायद्यासाठी सामान्य जनतेला बरबाद करण्याचे काम केले असून देशाचे संविधान आणि लोकहिताचे कायदे बदलविणाऱ्या भाजप सरकार विरोधात येत्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काम करण्यासाठी राज्यातील तेरा डावे, पुरोगामी, आंबेडकरवादी राजकीय पक्ष एकत्र येवून प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र नावाने आघाडी तयार करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यातही ही आघाडी जोमाने काम करणार आहे.
प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र मध्ये सहभागी पक्ष/संगटना
१. शेतकरी कामगार पक्ष २. जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र
३. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
४. स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना ५. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
६. भारतीय कम्युनिस्ट पार्टी
७. समाजवादी पार्टी
महाराष्ट्र
८. बहुजन विकास आघाडी पक्ष
९. सत्यशोधक कम्युनिस्ट १०. लाल निशाण पक्ष
११. भाकपा (माले) लिबरेशन
१२. रिपाई (सेक्युलर ) पार्टी
१३. श्रमिक मुक्ती दल
प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या गडचिरोली जिल्हा
समन्वय समितीमध्ये सहभागी व सक्रीय पक्ष/संगठना
१. शेतकरी कामगार पक्ष २. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
३. भारतीय कम्युनिस्ट पार्टी
४. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
५. समाजवादी पार्टी महाराष्ट्र
६. अखिल भारतीय रिपब्लीकन पक्ष
७. गोंडवाना गणतंत्र पार्टी
८. आदिवासी विकास युवा परिषद
९. खदानविरोधी ग्रामसभा



