राजकीय

भाजप हाच ओबीसी चा खरा शत्रू – अनिल देशमुख

गडचिरोली,प्रतिनिधी :-

 देशात भाजपच हाच ओबीसी चा खरा शत्रू असल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी गुहामंत्री तथा राष्ट्रवादी कॉंगेस चे जेष्ठ नेते आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे.ओबीसी करिता भविष्यात मोठा आंदोलन करणार असल्याची माहिती आज गडचिरोली येथील कुणबी मोर्चा निमित्य आले असता त्यांनी गामा च्या पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

भाजपचे जेष्ठ ओबीसी नेते एकनाथ शिंदे,मुंडे हे यांना भाजपने राज्याचे मुख्यमंत्री पदी बनविले नाही.ज्या भाजपचे माजी पंतप्रधान स्व.व्ही.पी.सिंग यांनी लागू केलेलं मंडल  आयोग विरोधात कुंमंडल आंदोलन केले, तोच भाजप आच ओबीसी करिता जागरण आंदोलन कसे काय काढत आहे असा प्रश्न भाजपला करीत देशात भाजपच हाच ओबीसी चा खरा शत्रू असल्याचा गंभीर आरोप करीत ओबीसी करिता सरकार विरोधात मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंगेस चे जेष्ठ नेते आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांबी ओबीसी यांचे करिता प्रत्येक जिल्ह्यात ७२ वसतिगृह बंधनार होते. राज्यात एकही वसतिगृह ते बांधले नाही. साधार योजने मार्फत ओबीसी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत शिक्षणाकरिता करावी. शेतकऱ्यांचा धानाला ४०००/-, सोयाबीन ला ७०००/- आणि कापूस ला १२०००/- रुपये भाव द्यावा अशी मागणी आज पत्रकार परिषद मध्ये केली आहे.

राज्यात कंत्राटीकरण सरकार करीत आहे, हा निर्णय रद्द झाला पाहिजे.राज्यातील जिल्हा परिषदेच्य १४,५७७ शाळाचे खाजगीकरण करणार आहे. या शाळा खासगी उद्योंगाना देणार आहे. नाशिक जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेला दारूविक्रेता देण्यात आली त्याच दिवशी गौतमी पाटील चा नृत्याचा कार्यक्रम करून आनंदोत्सव साजरा केला. शासन एक प्रकारे नोकरी चे द्वार बंद करीत आहे असा  आरोप राज्याचे माजी गुहामंत्री तथा राष्ट्रवादी कॉंगेस चे जेष्ठ नेते आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी गडचिरोली जिल्ह्याध्यक्ष अतुल गण्यारपवार, जेष्ठ नेते संजय ठाकरे,शहर अध्यक्ष विजय गोरडवार, शेमदेव चाफले,प्रकाश ताकसांडे,संजय कोचे आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.