आपला जिल्हाराजकीय

जयश्रीताईना विधानसभेत पाठविण्यासाठी जनतेनी शेकापच्या पाठीशी राहावे

भाई दिगंबर कांबळे यांचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शेतकरी कामगार पक्ष गेली पंच्याहत्तर वर्षे सातत्याने गरिबांसाठी रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्ष करीत आहे. गडचिरोली सारख्या टोकावरच्या गरीब शेतकरी, शेतमजूर जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्षशिल नेतृत्व असलेल्या जयश्रीताई जराते यांना विधानसभेत पाठविण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात शेतकरी कामगार पक्षाची मजबूत बांधणी करावी, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या रस्ते/महामार्ग बाधित शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी केले.

गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार जयश्रीताई जराते यांच्या प्रचार – प्रसाराचे धोरण ठरविण्यासाठी वसा – पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पोर्ला येथे शनिवारला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटक म्हणून भाई दिगंबर कांबळे बोलत होते. पुढे ते म्हणाले की, गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात विकासाच्या नावाने रस्ते, महामार्ग, रेल्वे इत्यादी कामांसाठी शेतकऱ्यांच्या शेतजमीनी कवडीमोल दराने घेण्याचे कारस्थान सरकारने रचलेले आहे. जिल्ह्यातील शेतकरी जयश्रीताईंच्या पाठिशी उभे राहिले तर अन्यायकारक पध्दतीने एक इंच सुध्दा शेतजमीनी शासनाला संपादित करु देणार नाही.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेकापच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते तर मार्गदर्शक म्हणून पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहनराव गुंड, महिला नेत्या जयश्रीताई जराते, सत्कारमूर्ती म्हणून किसान सभेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नवनियुक्त झालेले काॅ. डाॅ. महेश कोपूलवार, प्रमुख अतिथी म्हणून भाई शामसुंदर उराडे (मध्यवर्ती समिती सदस्य), भाई अक्षय कोसनकर, डॉ. गुरुदास सेमस्कर (जिल्हा समिती सदस्य), भाई अशोक किरंगे ( जिल्हा समिती सदस्य), अभिलाषा मंडोगडे (जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी), भाई गोविंदा बाबनवाडे (जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी), भाई पवित्र दास (जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी), भाई रामदास आलाम (जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी), भाई डंबाजी भोयर (जिल्हाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी) तसेच विशेष अतिथी म्हणून पोर्णिमाताई खेवले, पोर्णिमाताई शेंडे, पोर्णिमाताई कांबळे, हेमलताताई मुनघाटे, अप्सरा डोईजड (महिला आघाडी) विश्वनाथ पा. मशाखेत्री, तुळशिदास दाणे, गोपाल गेडाम (अध्यक्ष, जयगंगा मच्छिमार सहकारी संस्था, पोर्ला), प्रभाकर पा. डोईजड, चंद्रकांत भोयर, सौ. किरणताई मेश्राम माजी ग्रा.प. सदस्य (अडपल्ली), प्रामुख्याने उपस्थित होते.

मेळाव्या दरम्यान किसान सभेचे नवनियुक्त राज्य कार्याध्यक्ष काॅ. डाॅ. महेश कोपूलवार आणि भाई रामदास जराते व जयश्रीताई जराते यांच्या प्रयत्नातून मौजा काटली येथे बांधून देण्यात येणार असलेल्या सहा घरकूल धारकांना घरकूलांच्या चिन्हांचे वाटप करण्यात आले.

मेळाव्याचे प्रास्ताविक डाॅ. गुरुदास सेमस्कर, संचालन विनोद मेश्राम यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भोयर (काटली), यशवंत मुरकूटे, शालिक भोयर, रुषी कोल्हे (पोर्ला), हिराचंद कोडगले (नगरी), मार्कडी आवारी (नवरगाव), बाळकृष्ण मेश्राम (अडपल्ली), आत्माराम मुनघाटे (गोगाव), रवि कंकलवार (कुऱ्हाडी), कुमदेव गायकवाड (साखरा), शिवा ताटपल्लीवार (मोहझरी), काटली शाखेचे प्रकाश पा. डोईजड, विलास भोयर (गाव शाखा चिटणीस), कैलास शिंपी (खजिनदार), कामोद मुनघाटे, रेवनाथ मेश्राम (सहचिटणीस) अडपल्ली शाखेचे प्रकाश भोयर (शाखा चिटणीस), किसन टिंगूसले (खजिनदार), ईश्वर मंगर, सूमीत मानकर (सहचिटणीस) साखरा शाखेचे सचिन झरकर (खजिनदार), सुखदेव मानकर, किशोर दडमल (सहचिटणीस) मोहझरीचे डिकेश ठाकरे, रोशन भोयर, भास्कर कोल्हे, सुरेश भोयर (नवरगाव), नगरीचे शरद कोसमसिले, संगीता चिंचोलकर, कल्पना डोईजड, धर्माजी रामटेके यांनी परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker