आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोलीत श्री महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील गोकुळनगर बायपास रोड परिसरात असलेल्या इच्छापूर्ती शिव-साई-नाग मंदिरात श्री महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून, २४ ते २७ जून २०२६ या कालावधीत विविध धार्मिक विधी, पूजन कार्यक्रम आणि भक्तिमय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री दादाश्री बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली, श्री दादाश्री बहुउद्देशीय महिला बचत गट, मानवता पथ भक्ती गुरुमार्ग (महाराष्ट्र) तसेच समस्त मानवता पथ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त महादेव मंदिराचे लोकार्पण तसेच शिवलिंग व नागदेवता यांच्या मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, २४ जून रोजी देवपूजन, जलाधिवास, पुष्पाधिवास, धृताधिवास, हवनपूजन व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जून रोजी धान्याधिवास, मिष्ठान्नाधिवास, औषध्याधिवास तसेच हवनपूजन व आरती होणार आहे. २६ जून रोजी वस्त्राधिवास, धूपाधिवास, शय्याधिवास आणि विविध धार्मिक विधी पार पडतील.

२७ जून रोजी मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असून सकाळी मूर्ती स्थापना, अभिषेक, श्रृंगार दर्शन, पूर्णाहुती व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर वृद्धाश्रमात भोजनदान कार्यक्रम तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, धर्म, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.

या मंगलमय सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक, भाविक व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker