आपला जिल्हासामाजीक

शासकीय औद्योगिक संस्थेत ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

आलापल्ली, प्रतिनिधी :-

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शासकीय औद्योगिक संस्था, आलापल्ली येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेचे प्रशिक्षणार्थी, प्राचार्य, निदेशक तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व पुतळ्याचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि जलाभिषेक करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सर्वसाधारण प्राचार्य नितीन श्रीगिरीवार होते, तर कौस्तुभ गाडेवार हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांचे स्वागत शिल्प निदेशक वरुण झंझाड यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे कौस्तुभ गाडेवार यांनी “पर्यावरण आणि आजचे तरुण” या विषयावर मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवरही त्यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. तसेच शासकीय औद्योगिक संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल धंदरे यांच्यासह संस्थेतील सर्व निदेशक व प्रशिक्षणार्थींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोमल ठाकरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उमेश बकाल यांनी मानले.

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभिमान, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे वातावरण यावेळी अनुभवास आले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker