ताज्या घडामोडी

TET 2026 परीक्षा पुढे ढकलली; भिवंडीत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयाने निर्णय

पुणे, प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आधीच उपलब्ध असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, २७ जून २०२६ रोजी पहाटे भिवंडी पोलिसांनी छापा टाकून काही संशयितांची चौकशी केली. त्यानंतर परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, संबंधितांकडे असलेल्या माहितीतील काही प्रश्न हे TET 2026 च्या प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर परीक्षेची पूर्ण पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी २८ जून रोजीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून नवीन परीक्षा दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, TET 2026 संदर्भातील पुढील सर्व अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker